एमपीएससी पास
मी मध्य प्रदेशातील सिवी जिल्ह्यात जमुआत राहणारा आहे. केवळ १५०० लोकसंख्या असलेला हा भाग अतिशय मागास आहे. पायाभूत सुविधा कोणत्याही नाहीत. वडील आज सहायक प्राध्यापक आहेत. पण त्यावेळी अस्थायी शिक्षक असायचे. त्यांचे वेतन नाममात्र असायचे.
आई चौथी शिकली आहे. ती अंगणवाडीत काम करते. अशा वातावरणात माझे प्राथमिक शिक्षण माझ्या गावात केवळ सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या सरकारी शाळेत झाले. मी लहानपणापासून शिक्षणात चांगला आहे. आमच्या शाळेत एकच शिक्षक असायचे. शाळा उघडणे, स्वच्छता करणे, सतरंज्या टाकणे, इतकेच काय पण घंटा वाजवायचे कामही आम्हालाच करावे लागायचे. माझी शाळा सातवीपर्यंतच होती. म्हणून आठवीला लखनादौन सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागला. शाळेपासून दोन किमी अंतरावर आम्ही एक खोली भाड्याने घेतली होती. आम्ही शाळेत चालत जात असू आणि चुलीवर अन्न शिजवत असू. बहुतेक वेळा चटणी-भाकरी खावी लागत असे. जेव्हा भाऊ बरोबर नसायचा, तेव्हा मी रडतच झोपी जात असे. अशा संघर्षानंतर आठवीत मी चांगले मार्क मिळविले. नववीत चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आणि वसतिगृहात राहायला जागाही मिळाली. इथून पाच किमी अंतरावर शाळा होती. पण बहुतेक अंतर पायी चालत जावे लागायचे.
बारावीनंतर मी फोटोकॉपी दुकानात कामास लागलो. थोडे पैसे मिळवावेत हा उद्देश होता. पीईटी पास केल्यानंतर ग्रीन कार्डधारी असल्याने जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेजात मला प्रवेश मिळाला. २००७ मध्ये इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा वडिलांना दरमहा केवळ दोन हजार वेतन मिळत होते. पण माझी इंजिनिअरिंग फी माफ होऊनही महिना २१०० रुपये होती. आई- वडील आणि लहान भाऊ सोनू कामे करून माझा खर्च भागवत होते. परीक्षेचे निकाल ऐकून मात्र धक्काच बसला. चार विषयात मी नापास झालो होतो. याची पुन्हा तयारी केली. खर्च काढण्यासाठी मी २००८ इंजि. दुसऱ्या वर्षापासून शिकवण्या सुरू केल्या. २०११ मध्ये इंजिनिअरिंग करूनही चांगला जॉब मिळाला नाही. तेव्हा इंदोरमध्ये पेट्रोल पंपावर सुपरवायझर झालाे. पण २०१२ मध्ये जबलपूरमध्ये पुन्हा ट्यूशन्स सुरू केल्या. आई- वडील त्रासून गेले होते. कारण माझ्या शिक्षणासाठी त्यांना बराच खर्च झाला होता. यादरम्यान मी व्यापम वनरक्षक परीक्षा सहजपणे पास केली. सिवनी जिल्ह्यात शिकारा येथे पोस्टिंग मिळाली. जंगलात एमपीएससी तयारीसाठी मी पुस्तके जवळ ठेवत असे. २०१४ साली जबलपूरच्या शस्त्र भांडारात भरती निघाली आणि मला तेथे नोकरी मिळाली. वनरक्षक पदाचा राजीनामा दिला. पण गेल्या दहा महिन्यांचे वेतन मिळाले. एक दिवस माझा मित्र इंद्रेशने सांगितले की, पीएससीची पूर्ण ताकदीने तयारी कर. मी या परीक्षेच्या तयारीला लागलो. २०१३-१४ मध्ये एमपीएससीची प्राथमिक परीक्षा दिली, पासही झालो. पण मुख्य परीक्षेत नापास झालो. यानंतर घरातल्याप्रमाणे इतर लोकही मला नावे ठेवू लागली की, कोचिंग क्लास लावल्याशिवाय पीएससी परीक्षा तू कसा पास होशील? परंतु मी हार मानली नाही आणि पुन्हा एकदा पीएससी परीक्षेच्या तयारीला लागलो. २०१५ ची परीक्षा देऊन निकालही घेतला. परंतु अंतिम निवड यादीत माझे नाव नव्हते. मी निश्चय केला की पुढच्या वेळी मात्र निश्चित बाजी मारेन. मोठा मुलगा असल्यामुळे आई-वडिलांच्या माझ्याबद्दल फार अपेक्षा होत्या. शेवटी ते तरी किती काळ संघर्ष करणार? वर्षभराच्या तयारीनंतर २०१६ साली मी पुन्हा या परीक्षेच्या मागे लागलो. पण पीएससीची प्राथमिक परीक्षादेखील मी पास झालो नाही. यामुळे मी आतून अतिशय दु:खी झालो. कुठे चूक होत आहे, हे मला समजत नव्हते. काही महिने गेले आणि २०१७ साली चौथ्यांदा पीएससीची परीक्षा देण्यासाठी बसलो. तरीदेखील माझी निवड झाली नाही. लोक माझी टर उडवत होते. मला असे वाटले की, मी आता काही करू शकत नाही. आत्महत्येचे विचारदेखील मनात येत होते. परंतु यावेळी कुटुंबाने फार साथ दिली. त्यामुळेच २०१८ साली मी पुन्हा पाचव्यांदा पीएससीची परीक्षा देण्याचे धाडस करू शकलो. मी माझ्या चुका सुधारल्या. ज्यांची निवड झाली, त्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून काही मार्गदर्शक सूचना घेतल्या. हा माझा शेवटचा प्रयत्न असल्यामुळे स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. मुख्य परीक्षा सहजपणे पास झालो. मुलाखतीसाठी निवड झाली तेव्हा आतून असे वाटत होते, की यावेळी निश्चित निवड होईल. २६ जानेवारीला रिझल्ट आला तेव्हा १५७५ पैकी ९३० गुण िमळाले होते. २ फेब्रुवारीला निवड यादी लागली तेव्हा माझी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली होती. मी आनंदाने बेहोष झालो. कोणत्याही पराभवाच्या शेवटी विजय असतो. मेहनत आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपण कधी अयशस्वी होणार नाही. मी माझ्या गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी अवश्य प्रयत्न करेन.

No comments:
Post a Comment